|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » घराच्या साफसफाईवरून सख्ख्या भावांत हाणामारी

घराच्या साफसफाईवरून सख्ख्या भावांत हाणामारी 

सावंतवाडी

नेमळे-देऊळवाडी येथे सामायिक घराची साफसफाई करण्याचा किरकोळ कारणावरुन दोन सख्ख्या भावात मारामारी झाली. या मारहाणीत सदानंद कृष्णा परब (68) हे जखमी झाले. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाल्याने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. हा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यावरुन सख्खा भाऊ अरविंद कृष्णा परब याच्या विरुद्ध अदाखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती ठाणे अंमलदार पोलीस हवालदार दीपक लोंढे यांनी दिली.

सामायिक घरात श्रीकृष्ण जन्मोत्सव होत असल्याने घराची साफसफाई करण्यासाठी सदानंद परब गेले. त्यावेळी साफ करण्याच्या किरकोळ कारणावरुन अरविंद परब यांनी धक्काबुक्की केली. हातातील लोखंडी रिंग डोक्यावर मारण्याचा प्रयत्न चुकविला. त्यामुळे अरविंद परब याचा हाताचा ठोसा सदानंद परब यांच्या नाकावर बसून जखमी झाले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करीत आहेत.