|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पं. स.च्या महिला कर्मचाऱयांना कोंडले

पं. स.च्या महिला कर्मचाऱयांना कोंडले 

वेतोऱयात शौचालयाची पाहणी करण्यासाठी गेल्या असता घटना

वार्ताहर/ वेंगुर्ले

  पंचायत समितीच्या संपूर्ण स्वच्छ भारत मिशन गटसमन्वयक द्रौपदी नाईक व समूह समन्वयक श्रीमती किनळेकर या वेतोरे येथे संदीप नाईक यांच्या शौचालयाची तपासणी करण्यासाठी गेले असता त्यांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला. कृषी अधिकारी विद्याधर सुतार हे घटनास्थळी आल्यानंतर महिला कर्मचाऱयांना सोडण्यात आले. या प्रकाराचा पं. स. कर्मचारी संघटनेने निषेध केला असून यापुढे असा प्रकार घडल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

वेतोरे येथील विजय वासुदेव नाईक यांनी गावातील संदीप शंकर नाईक यांच्या विरोधात सन 1997-98 साली शौचालयाला दिलेल्या अनुदानाचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी 31 रोजी संपूर्ण स्वच्छ भारत मिशन गटसमन्वयक द्रौपदी नाईक यांना शौचालयाच्या पाहणीचे आदेश दिले होते. त्यानुसार सौ. नाईक व समूह समन्वयक श्रीमती किनळेकर वेतोरे संदीप नाईक यांच्या घरी गेले असता त्यांना घरातच बोलावून कोंडून ठेवण्यात आले. तसेच शिवीगाळ करून जोपर्यंत तुमचे वरि÷ अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत घरातून बाहेर सोडणार नाही, अशी धमकीही देण्यात आली. त्यामुळे या महिला कर्मचाऱयांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. त्यानुसार कृषी अधिकारी विद्याधर सुतार घटनास्थळी गेल्यावर या कर्मचाऱयांना सोडण्यात आले.

दरम्यान, या प्रकारचा पंचायत समिती कर्मचारी संघटनेकडून तीव्र निषेध करण्यात आला आहे. कर्मचाऱयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि कर्मचाऱयांची कोणतीही चूक नसताना चांगली वागणूक मिळत नसेल, तर कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समिती कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.