|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पवनऊर्जा लोकार्पण सोहळा लवकरच!

पवनऊर्जा लोकार्पण सोहळा लवकरच! 

वार्ताहर/ देवगड

देवगड पवनऊर्जा प्रकल्पाच्या लोकार्पणापूर्वी प्रकल्पाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ. सावळकर यांनी शनिवारी दुपारी प्रकल्पस्थळी भेट दिली. लोकार्पण सोहळा येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्याचे नियोजन होत असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली.

देवगड पवनऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा करण्याबाबत राज्य शासन विचाराधीन आहे. यासाठी या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी ऊर्जा राज्यमंत्री मदन ऐरावत यांचे स्वीय सहाय्यक डॉ. सावळकर यांनी अधिकाऱयांसमवेत प्रकल्पस्थळी भेट दिली. या पाहणीचा अहवाल ऊर्जा मंत्रालय व ऊर्जा मंत्र्यांना दिल्यानंतर लोकार्पण सोहळय़ाची तारीख निश्चित केली जाणार आहे. दरम्यान, जठार यांनी येत्या महिनाभरात या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळय़ाचा कार्यक्रम निश्चित होईल, असे सांगितले. यावेळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता श्री. भगत, देवगडचे उपकार्यकारी अभियंता जयकुमार कथले, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, नगरसेविका हर्षा ठाकुर, प्राजक्ता घाडी आदी उपस्थित होते.

Related posts: