|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कागल एमआयडीसी बससाठी गडहिंग्लज, कडगावला रास्ता रोको

कागल एमआयडीसी बससाठी गडहिंग्लज, कडगावला रास्ता रोको 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

कागल पंचतारांकीत एमआयडीसीला जाणारी गडहिंग्लज आगाराची बस काळभैरी मार्गे व कडगाव मार्गे सोडावी या मागणीसाठी शनिवारी सकाळी चन्नेकुप्पी, खमलेट्टी परिसरातील ग्रामस्थानीं गडहिंग्लज बसस्थानकात बस रोखून धरली व कडगाव येथे ग्रामस्थांनी रास्ता रोको करून आंदोंलन केले.

चन्नेकुपी, खमलेट्टी परिसरातील जवळपास 90 कर्मचारी कागल पंचताराकीत एमआयडीसी येथे कामाला जात असून दररोज भैरी मार्गे जाणारी अचानक शनिवारी कडगाव मार्गे जात असल्याचे समजले. त्यामुळे मासिक पासमध्ये कर्मचाऱयांना अतिरिक्त शुल्क व वेळ खर्च करावा लागणार असल्याने संतप्त कर्मचाऱयांनी ती बस गडहिंग्लज बसस्थानाकावर रोखून धरून भैरी मार्गे सोडावी अशी मागणी माजी सभापती अमर चव्हाण यांच्या नेतृत्वखाली करण्यात आली.

दरम्यान कडगाव, बहिरेवाडी, मुमेवाडी परिसरातील कागल पंचताराकीत एमआयडीसीला काम करणाऱया कर्मचाऱयांनी सकाळी कडगाव येथे रास्तारोको करून ही बस कडगाव मार्गे पुन्हा सुरू करावी अशी मागणी काली. एकाच बससाठी दोन ठिकाणी आंदोलन झाल्याने आणि दोन्ही ठिकाणच्या कर्मचाऱयांची वेगवेगळी मागणी असल्याने एस. डी. महामंडळाच्या आधिकाऱयांची तारांबळ उडाली. दोन्ही मार्गे बस सोडावी यासाठी केलेल्या आंदोलनामुळे याठिकाणी मोठी गर्दी झाली होती.

गडहिंग्लज बसस्थानाकावर केलेल्या आंदोलनात पोलीसांनी हस्तक्षेप करून परिवहन अधिकाऱयांशी चर्चा केली आणि दोन तासानी काळभैरी मार्गे बस सोडण्याचा निर्णय केला. यावेळी जयवंत कोकीळे, महेश घेवडे, भिमराव माने, काशिनाथ धुळाण्णावर, उदय हाळापगोळ, अनिल विचारे, कुमार गोडूरे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.

कडगाव येथे या मार्गे बस सोडल्याशिवाय हटणार नसल्याची भुमिका घेतल्याने शेवटी परिवहन अधिकाऱयांना कडगाव मार्गे दुसरी बस सोडण्यास भाग पाडले. यावेळी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, सरपंच संजय बटकडली, उपसरंपच मंजिरी रननवरे, लता चौगुले, माधूरी कदम, अभिजीत देसाई, विश्वनाथ कांबळे, अजित जामदार, रोहीत पाटील यांच्यासह आदीचा समावेश होता.

Related posts: