|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लज, एम आर, जागृतीची विजयी सलामी

गडहिंग्लज, एम आर, जागृतीची विजयी सलामी 

प्रतिनिधी/गडहिंग्लज

येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आयोजीत शालेय फुटबॉल स्पर्धेला शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. 17 वयोगटात गडहिंग्लज हायस्कूल, एम. आर. हायस्कूल, जागृती हायस्कूल यांनी तर 14 वर्षे गटात वि. दी. शिंदे, केदारी रेडेकर पब्लीक स्कूलने विजयी सलामी दिली. आप्पासाहेब कोले, रूदाप्पा हत्ती-षण्मुगम यांच्या स्मरणार्थ येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत तालुक्यातील 36 संघाचा समावेश आहे.

17 वयोगटातील गडहिंग्लज हायस्कूलने क्रिएटिव्ह स्कूलला 3-0 असे नमविले. गडहिंग्लजचा दिपक पोवारने दोन तर अभिषेक पोवारने एक गोल केला. एम. आर. हायस्कूलने नवोदित औरनाळच्या पार्वती हायस्कूला 4-0 असा पराभव केला. एम. आरच्या श्रावण पाटीलने दोन तर अजित चव्हाण, सौरभ दोरूगडे यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. जागृतीने उर्दु हायस्कूलचा 3-1 असा पराजय केला.

सुरूवातीस युनायटेडचे अध्यक्ष जगदीश पट्टणशेट्टी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले. उपाध्यक्ष संभाजी शिवारे, संचालक प्रशांत दड्डीकर, मनिष कोले यांच्यासह क्रिडाशिक्षक, पालक आणि खेळाडू उपस्थित होते.

14 वयोगटातील वि. दी. शिंदे हायस्कूलने सर्वोदय स्कूलला टायबेकरमध्ये 4-2 असा पराभव केला. केदारी रेडेकर पब्लीक स्कूलने बॅ. नाथ. पै विद्यालयावर 3-0 अशी मात केली. ओमकार घुगरी, वहाझ लमतुरे, कुपिंदर पोवार यांनी पंच म्हणून काम पाहिले.