|Sunday, July 21, 2019
You are here: Home » Top News » कन्हैय्या कुमार बिहारमधून लोकसभा निवडणूक लढवणार

कन्हैय्या कुमार बिहारमधून लोकसभा निवडणूक लढवणार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार आता राष्ट्रीय राजकारणात प्रवेशाच्या तयारीत आहे. कन्हैय्या कुमार 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे. कन्हैय्या कुमारने लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत सर्व डाव्या संघटनांमध्ये एकमत झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कन्हैरय्या कुमार बिहारच्या बेगूसराय येथून सीपीआयच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार आहे.

 

काँग्रेस, राजद आणि डाव्या संघटना या महाआघाडीकडून कन्हैय्या कुमार हा बेगूसराय येथून लोकसभा निवडणूक लढवेल. कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीवर लालू प्रसाद यादव यांनाही कळवण्यात आले असून त्यांनाही यावर कोणताच आक्षेप नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप कन्हैय्या कुमारच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, किंवा स्वतः कन्हैय्या कुमारचीही यावर अद्याप प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. सध्या बेगुलसराय लोकसभा सीटवर भाजपाचा कब्जा आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे भोला सिंह येथून विजयी झाले होते.