|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » न्या. रंजन गोगाई बनणार भारताचे नवे सरन्यायाधीश

न्या. रंजन गोगाई बनणार भारताचे नवे सरन्यायाधीश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाकडे केली आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या शिफारशीला केंद्र सरकार अंतिम मंजूर देईल. न्यायमूर्ती गोगोई 3 ऑक्टोबरला सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील अशी माहितीही सूत्रांकडून दिली जात आहे.ज्येष्ठ न्यायमूर्तींची सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्याची परंपरा आहे. मात्र औपचारीकरित्या नाव पाठवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो. त्यामुळे विद्यमान सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी ही पंरपरा कायम ठेवली आहे.न्यायमूर्ती रंजन गोगोई फेब्रुवारी 2001मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतले होते. फेब्रुवारी 2011मध्ये त्यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली. त्यानंतर एप्रिल 2012 पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.