|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » मैत्रीचे सेलिब्रेशन पार्टीमध्ये

मैत्रीचे सेलिब्रेशन पार्टीमध्ये 

मैत्रीसाठी काहीही… असे म्हणणारे अनेक जण जेव्हा नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा मैत्रीच्या आणाभाका ते कधीच मागे विसरतात! भविष्याच्या तरतुदीसाठी आपापल्या रस्त्यावर लागलेले हे सर्व मित्र मग केवळ आठवणींच्या कुपीत किंवा एका फोटोच्या चौकटीतच सीमित राहतात. अशा या सर्व मित्रांना पुन्हा एकदा एकत्र येण्यास प्रवफत्त करणारा ‘पार्टी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

मैत्रीचा हँगओव्हर चढवणाऱया या ट्रेलरमध्ये सुव्रत जोशी, अक्षय टंकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर या चार मित्रांची धम्माल-मस्ती आणि त्यांची लव्हस्टोरी आपणास पाहायला मिळते. पण, त्यासोबतच कालांतराने विभक्त झालेल्या या चौकडींचे दुखणंदेखील यात दिसून येते. तसेच प्राजक्ता माळी आणि मंजिरी पुपालादेखील यात दिसून येत आहेत. शिवाय या ट्रेलरमधील घराचा आणि गाडीचा हप्ता भरताना मैत्रीचादेखील हप्ता भरायचा असतो हे विसरून जातो. आपण हा संवाददेखील प्रेक्षकांना भावूक करून टाकतो. आपापल्या आयुष्यात आणि संसारात गुंग झाल्यानंतर मागे राहून गेलेल्या जुन्या मित्रांची आठवण पार्टी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना करून देतो. धम्माल विनोदाची परिपूर्ण मेजवानी देणाऱया या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना ‘पार्टी’ हा चित्रपट प्रेक्षकांना हसवून लोटपोट करणारा आहे याचा अंदाज येतो. हासू आणि आसू आणणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एंटरटेंटमेंट पॅकेज घेऊन येत आहे. नवविधा प्रोडक्शन निर्मित आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ चित्रपटाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांची प्रस्तुती असलेला हा चित्रपट तमाम मित्रांचे नाते आणखी घनिष्ट करण्यासाठी येत्या 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.