|Friday, July 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » नात्यांची नवी परिभाषा सांगणारी तुझसे है राबता

नात्यांची नवी परिभाषा सांगणारी तुझसे है राबता 

नाती कुठल्याही कायद्याने किंवा रक्ताने बनलेली नसली तरी ती खास असतात. कारण आपण ती मनापासून मानत असतो. 3 सप्टेंबरपासून झी टीव्ही एक नवीन मालिका ‘तुझसे है राबता’ सुरू करण्यासाठी सज्ज आहे. ही कथा आहे आईमुलीच्या खास, कडूगोड नात्याची. अनुप्रिया आणि कल्याणी यांचे नाते रक्ताचे नाहीये, त्या खरं तर एकमेकींना नीटशा ओळखतही नाहीत. पण, एका वेगळय़ाच नात्याने त्या जोडल्या गेल्या आहेत. ‘तुझसे है राबता’ या मालिकेची निर्मिती फुल हाऊस मीडियाची असून 3 सप्टेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता झी टीव्हीवर या मालिकेचे प्रसारण होईल.

 कल्याणी (रीम शेख) ही आपल्या पालकांची अतिशय लाडकी मुलगी आहे. त्यांचा परिवार अगदी चित्रातल्यासारखा सुरेख आहे. पण एक दिवस हा परिवार अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळतो. एका विचित्र अपघातामध्ये कल्याणीची आई माधुरी (आम्रपाली गुप्ता) हिचे निधन होते आणि तिचे वडील अतुल पंकज विष्णू यांना त्याबद्दल अटक होते आणि मग कल्याणीची पालक बनते एक अनोळखी स्त्राr अनुप्रिया (पूर्वा गोखले). कल्याणीच्या मते तिच्या परिवाराच्या दुर्दैवाला अनुप्रियाच कारणीभूत आहे. त्यामुळे अनुप्रियाच्या घरी राहायला जायच्या कल्याणी अगदी विरोधात आहे. कल्याणी तिला ओळखत नाही आणि तिच्या मते अनुप्रिया ही निश्चितपणे तिच्या वडिलांच्या आयुष्यातील दुसरी स्त्राr आहे. ‘तुझसे है राबता’ ही मालिका प्रेक्षकांना कल्याणीच्या हय़ा जीवनप्रवासावर घेऊन जाईल, जिथे आपल्या परिवाराच्या झालेल्या नुकसानाचा सूड घेण्याची मानसिकता कल्याणीची आहे. आपल्या आईच्या जागी दुसऱया स्त्राrला स्वीकारण्याची तिची अजिबात तयारी नाहीये. काय कल्याणी अनुप्रियाला त्रास देईल? काय कल्याणीच्या वडिलांना भेटल्याच्या पश्चात्ताप अनुप्रियाला होऊ लागेल? की वास्तविकता समजल्यानंतर कल्याणीचा आपल्या स्वत:च्या कुटुंबाबद्दलचा संपूर्ण दृष्टीकोनच बदलेल?

 झी टीव्हीच्या बिझनेस हेड श्रीमती अपर्णा भोसले म्हणाल्या, ‘आपल्या आयुष्यातील काही नात्यांना नाव नसते. पण, ती नाती आपल्याला मनापासून आवडतात. आमच्या नवीन मालिकेत याच गोष्टीकडे लक्ष वेधले जाते की कसे मध्यमवर्गीय समाजात केवळ कौटुंबिक नात्यांनाच महत्त्व दिले जाते. इथे केवळ रक्ताची नातीच घट्ट मानली जातात. ‘तुझसे है राबता’ ही मालिका रक्ताच्या या नात्यांच्या पलीकडील व्याख्या नसलेली अपारंपरिक नाती साजरी करेल. मालिकेमध्ये सेहबान अझिम, आम्रपाली गुप्ता, सविता प्रभुणे, शगुन पांडे, पंकज विष्णू आणि अन्य कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.