|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अफगाणिस्तानात जनरल मिलर यांच्याकडे नाटोची धुरा

अफगाणिस्तानात जनरल मिलर यांच्याकडे नाटोची धुरा 

काबूल

 अफगाणिस्तानात रविवारी अमेरिकेचे सैन्याधिकारी स्कॉट मिलर यांनी नाटो (उत्तर अटलांटिक करार संघटना) सैन्याचे नेतृत्व स्वीकारले आहे. मिलर यांनी जनरल जॉन निकलसन यांची जागा घेतली आहे. 17 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तालिबानला चर्चेसाठी भाग पाडण्याच्या अमेरिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना मिलर यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या पार्श्वभूमीवर तालिबान विरोधी लढाईचा दीर्घ अनुभव बाळगणारे मिलर किती यशस्वी ठरतात हे येणारा काळच निश्चित करणार आहे. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अफगाणिस्तानात दाखल झालेल्या पहिल्या सैन्य तुकडीत मिलर यांचाही समावेश होता. स्वतःच्या रणनीतीत यशस्वी होण्यासाठी आम्हाला शत्रू आणि वातावरण सातत्याने समजून घेत रहावे लागेल. आम्ही सद्यस्थितीबद्दल समाधानी होऊन स्वस्थ बसू शकत नाही असे नाटो मुख्यालयात आयोजित समारंभावेळी मिलर यांनी म्हटले आहे.