|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेसने केवळ स्वतःची गरीबी हटविली : वसुंधरा राजे

काँग्रेसने केवळ स्वतःची गरीबी हटविली : वसुंधरा राजे 

बाडमेर

 राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी विकासाच्या मुद्यावरून काँग्रेसवर मोठा शाब्दिक हल्ला चढविला आहे. काँग्रेसने गरीबी हटविण्यासाठी केवळ घोषणा दिल्या असून याच्या माध्यमातून केवळ स्वतःची गरीबी दूर केल्याचा आरोप राजे यांनी रविवारी केला आहे. राज्यातील पूर्वीच्या काँग्रेस सरकारजवळ विकासाबद्दल कोणताही दृष्टीकोन नसल्यानेच विकास रखडला होता. काँग्रेसने केवळ राजकारणावर लक्ष देत विकासाकडे दुर्लक्ष केल्याचे मुख्यमंत्री म्हणाल्या. बाडमेर जिल्हय़ातील बयातू येथील जाहीर सभेला राजे यांनी संबोधित केले.

जोधपूर विभागात ‘राजस्थान गौरव यात्रे’दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना राजे यांनी काँग्रेस सरकारने राज्यावर आर्थिक कर्जाचा मोठा भार टाकला होता, तरीही आपल्या सरकारने आव्हानांना तोंड देत विकासाच्या दिशेने मोठी वाटचाल केल्याचा दावा केला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत विजय नोंदविल्यानंतर मुख्यमंत्री झाले असता आर्थिक आव्हानांना सामोरे जावे लागले. परंतु कोणतेही कार्य दृढ इच्छाशक्तीच्या मदतीने पूर्ण केले जाऊ शकते. हा मार्ग अनुसरून पूर्ण राज्याचा विकास केल्याचे उद्गार राजे यांनी काढले आहेत.

मतभेद दूर ठेवा, एकजूट व्हा

मतभेद दूर ठेवून एकजूट व्हा असे आवाहन राजे यांनी जनतेला केले आहे. बाडमेर तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक तरुणाईला रोजगार प्राप्त होईल. काँग्रेस 50 वर्षांमध्ये पूर्ण करू शकलेली कामे भाजप सरकारने सत्यात उतरविली आहेत. जनतेसमोर स्वतःचे प्रगतीपुस्तक मांडणाऱया मी पहिली मुख्यमंत्री असल्याचा दावाही राजे यांनी केला.

Related posts: