|Thursday, June 27, 2019
You are here: Home » क्रिडा » मनजितच्या कामगिरीचा मला अभिमान : जॉन्सन

मनजितच्या कामगिरीचा मला अभिमान : जॉन्सन 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणाऱया मनजित सिंगच्या कामगिरीबाबत मला फारसे आश्चर्य वाटले नाही, असे प्रतिपादन या स्पर्धेत 1500 मी. धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविणाऱया भारताच्या जिनसन जॉन्सनने केले आहे.

या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जॉन्सनची पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत चांगली कामगिरी करता आली नाही. या क्रीडा प्रकारात मनजित सिंगने आपल्याला मागे टाकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मला या क्रीडा प्रकारात चांगली कामगिरी करता आली नाही पण माझाच सहकारी मनजित सिंगने सुवर्णपदक पटकाविले याचा मला निश्चित आनंद झाला आहे, असेही तो म्हणाला. या क्रीडा प्रकारात भारताच्या धावपटूंनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकाविले. मनजित सिंगने 800 मी. धावण्यांची शर्यत एक मिनिट, 46.15 सेकंदात जिंकली तर जॉन्सनने 1 मिनिट 46.35 सेकंदाचा अवधी घेत दुसऱया स्थानासह रौप्यपदक मिळविले. मनजित सिंगच्या कामगिरीबद्दल मला अभिमान वाटतो, असे केरळच्या 27 वर्षीय जॉन्सनने म्हटले आहे.