|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवास प्रारंभ

प्राथमिक शिक्षक सेवक पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवास प्रारंभ 

कोल्हापूर

खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सह. पतसंस्थेने 29 ऑगस्ट रोजी 25 व्या रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले. संस्थेच्या रौप्यमहोत्सव सोहळा कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सह. सोसायटीच्या ‘महालक्ष्मी हॉल’ येथे झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक भरत रसाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते वसंत हंकारे, संस्थेचे चेअरमन आनंदा हिरूगडे, सहकार प्रशिक्षक संजय पाटील प्रमुख उपस्थित होते.

प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे चेअरमन आनंदा हिरुगडे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अध्यक्षपदावरुन बोलताना संस्थापक रसाळे म्हणाले, अतिशय कठीण परिस्थितीत संस्थेची स्थापना झाली. पारदर्शी, काटकसरीचा कारभार करून कोणत्याही सभासदांची अडचण होणार नाही, याची काळजी घेवून ठेवीदारांची विश्वासार्हता प्राप्त आहे, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

सामाजिक परिवर्तनकार वसंत हंकारे यांनी ‘आनंददायी जीवन कसे जगावे’ यावर सभासदांना खळखळून हसवले. आभार व्हा. चेअरमन अनिल सरक यांनी मानले. सूत्रसंचालन सविता गिरी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संजय पाटील यांनी सभासदांना सहकार प्रशिक्षण दिले. यावेळी संस्थेचे आजी माजी संचालक, संस्थापक सभासद, ठेवीदार, हितचिंतक हजर होते. यावेळी संचालक श्री चंद्रकांत पाटील, शिवाजी भोसले, बाळासाहेब लंबे, अशोक पाटील, राजेश कोंडेकर, राजाराम हुल्ले, महादेव डावरे, कुमार पाटील, विकास कांबळे, छाया हिरुगडे, सारिका पाटील, सल्लागार समिती मच्छिंद्र नाळे, अरुण गोते, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी व सभासद हजर होते.