|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » प्रेरणा बालक मंदिर व संकल्प इंग्लिश स्कूलच्यावतीने गोकुळाष्टमी साजरी

प्रेरणा बालक मंदिर व संकल्प इंग्लिश स्कूलच्यावतीने गोकुळाष्टमी साजरी 

कोल्हापूर

येथील राजोपाध्येनगर परिसरातील संकल्प शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रेरणा बालक मंदिर व संकल्प इंग्लिश मेडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी चिमुकल्यांनी परिधान केलेली श्रीकष्णाची वेशभूषा सर्वांचे आकर्षण ठरली. यावेळी मुलांमध्ये प्रचंड उत्साह होता. संस्थेचे अध्यक्ष के. जी. पाटील यांच्याहस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी अलका माळी, सुमन माळी, सुनिता गुरव, गौरी पाटील, मुख्याध्यापक प्रकाश सुतार, पी. वाय. पाटील आदी उपस्थित होते.