|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बुध्दीमता जगण्याचे एकमेव साधन

बुध्दीमता जगण्याचे एकमेव साधन 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिक्षणाने बुध्दीचे मशागत होते, त्यामुळे जीवनाची शर्यत जिंकण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. ज्ञानाच्या जोरावरच संघटन व संघर्ष शक्य असतो. म्हणून बुध्दीमता जगण्याचे एकमेव साधव आहे, असे प्रतिपादन उपराकार लक्ष्मण माने यांनी केले.

निर्मिती विचारमंच आणि अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फौंडेशनतर्फे आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद भोजने होते.

माने म्हणाले, शिक्षणा शिवाय  एकजूट होणे अशक्य आहे. आयुष्यातील कोणतेही संकट दूर करण्यासाठी एकजुटीने कोणतेही संकट दूर करता येते. वाचनातून आपल्या देशातील महापुरूषांनी दिलेली शिकवण, संदेशाचे संवर्धन करण्याची गरज आहे. बुध्दीवान तरूणाईच देशाला प्रगतीपथावर नेवू शकतो. कारण या देशातील प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळी बुध्दीमता, कला, संकल्पना आहे. सोशल मिडीयातील संगणकापेक्षा आपल्या डोक्यातील संगणक अतिशय जलदगती आहे. त्यामुळे स्वत:च्या बुध्दीमतेवर विश्वास ठेवा, असा सल्लाही माने यांनी उपस्थितांना दिला.

अध्यक्षस्थानावरून  प्रा. आनंद भोजने म्हणाले, आपले भवितव्य आपल्या हातात आहे. त्यामुळे तरूणांनी काय करायचे हे ठरवले पाहिजे. दिवसभर ‘अभ्यास कौशल्य कसे विकसित करावे’ या विषयावर प्रा. टी. आर. गुरव यांनी, ‘व्यक्तिमत्व विकास कसा करावा’ फा विषयावर डॉ. कृष्णात पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी युवराज कदम होते ‘कला, लेखन व वक्तृत्व कसे विकसित करावे’ या विषयावर डॉ. अमर कांबळे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव पाटील होते. ‘क्रांतीकारी महामानव कसे समजून घ्यावेत’ या विषयावर डॉ. सर्जेराव पद्माकर यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. दयानंद ठाणेकर होते. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप झाला. अध्यक्षस्थानी मच्छिंद्र कांबळे होते.

यावेळी डॉ. दयानंद ठाणेकर, सतीश भारतवासी, मोहन मिणचेकर, सुशील कोल्हटकर, संघसेन जगतकर, अनिल म्हमाणे आदी उपस्थित होते.