|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोमंतकीयांना लागले चतुर्थीचे वेध

गोमंतकीयांना लागले चतुर्थीचे वेध 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्याला सध्या चतुर्थी सणाचे वेध लागले आहे. गोव्यात चतुर्थीची तयारी जोरात सुरु आहे. अवघ्या दहा दिवसांवर चतुर्थी येऊन ठेपली आहे. त्यामुळे गोमंतकीय सध्या चतुर्थी सणाच्या तयारीत व्यस्त आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तर मागील सुमारे पंधरा दिवसांपासून कामाला लागली आहेत.

घरोघरी सध्या रंगरंगोटी आणि सजावटीची कामे सुरु झाली आहेत. मखर सजावटीपासून घरातील अंतर्गत आणि बाहेरील सजावटीला सुरुवात झाली आहे. रात्रीची जागरणे करुन सजावटीची कामे केली जात आहेत. गोव्यात घरोघरी गणेश पुजन होत असल्याने ग्रामीण भागातही रात्री उशिरापर्यंत तरुण मंडळी जागी राहून काम करते. सार्वजनिक गणेश मंडळांचे काम तर जोरात सुरु करते. सार्वजनिक गणेश मंडळांचे काम तर जोरात सुरु आहे. गोव्यात मोठय़ा प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. त्याचबरोबर पोलीस स्थानकावरही गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सजावटीचे काम सध्या जोरात सुरु आहे.

गणेश मूर्तीकारही कामात व्यस्त

गणेश मूर्ती बनविणाऱया शाळांमधून मूर्तीवर अंतिम हात फिरविण्याचे काम जोरात सुरु आहे. मूर्ती तयार करणारे कलाकार सध्या या कामात व्यस्त आहेत. सुबक आकाराच्या लहान मोठय़ा मूर्ती तयार असून या मूर्तीवर अंतिम हात फिरविण्याचे काम सुरु आहे. ग्रामीण भागात कलाकार 200 ते 250 पर्यंत मूर्ती तयार करतात. त्यामुळे जून महिन्यापासूनच हे काम सुरु होते. सार्वजनिक गणेशमूर्ती या भव्य अशा असतात. त्यांची उंची आठ – दहा फुटापर्यंत असते. त्यामुळे ठराविक कलाकारच अशा भव्य मूर्ती घडवितात.

बाजारपेठाही सजू लागल्या

चतुर्थीनिमित्त बाजारपेठाही सजू लागल्या असून कपडे खरेदी व अन्य साहित्य खरेदी सध्या सुरु झाली आहे. या आठवडय़ात विद्युत रोषणाईचे व सजावटीचे साहित्य बाजारपेठातून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर मिठाईची दुकानेही पुढील चार, आठ दिवसांत सजू लागतील. त्याचबरोबर दारुकामाच्या साहित्य विक्रीची दुकानेही पुढील आठवडय़ात थाटली जातील.

कपडय़ांच्या दुकानातून कपडे खरेदीसाठी सध्या लोकांची गर्दी होत आहे. कपडय़ांच्या खरेदीवर चतुर्थी काळात लाखो रुपयांची उलाढाल होते. राज्यात दर्जेदार व ब्रॅण्डेड कपडय़ांना मोठी मागणी आहे. सध्या कपडय़ांचे व्यावसायिक ग्राहकांच्या सेवेत व्यस्त आहेत. राज्यातील प्रमुख मार्केटमधून कपडय़ांच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे.