|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’निमित्त कपडय़ांची दालने

‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’निमित्त कपडय़ांची दालने 

 

प्रतिनिधी/ पणजी

दरवर्षीप्रमाणे यंदाही पणजी येथील बालोद्यान ते फ्sढरीपर्यंतच्या पदपाथवर ‘जन्माष्टमी’निमित्त फ्sढरी भरविण्यात आली आहे. श्रावण महिन्यात येणाऱया विविध सणांसाठी बाजारपेठ नेहमीच आपल्यापरीने परिपक्क बनत असते. या बाजारपेठेत मुलांचे कपडे, पुरुष व महिलांसाठी विशेष कपडे, बॅग, स्वयंपाक करण्यासाठी लागणारी भांडी, कपसेट, टेबल सेट, खाजगी औषध कंपन्यांची दालने व विविधप्रकारच्या फ्ढर्निचर दालनांचा समावेश आहे. काही दिवसात गणेश चतुर्थी हा मोठा सण येणार असल्याने या दालनांमध्ये मोठय़ाप्रमाणात गर्दी होणार हे नक्की!

हिंदु धर्मात ‘गणेश चतुर्थी’ हा सर्वात महत्वाचा आणि मोठा सण मानण्यात येतो. चतुर्थीची तयारी म्हणून महिन्यापुर्वीच आपण डेकोरेशन करण्यास सुरुवात करतो. त्याचप्रमाणे माटोळी, पाट, चौरंग अशा आवश्यक चांगल्या दर्जाच्या वस्तू कुठे मिळतील याची चौकशीही केली जाते. अशा गरजू व्यक्तींना आता सर्वत्र फ्ढिरावे लागणार नाही. एकाच ठिकाणी विविध दालनांमध्ये या वस्तू उपलब्ध असल्याने आपल्याला हवी त्या दर्जाची वस्तू आपण निवडू शकतो.

आपल्याला हव्या असलेल्या लाकडी व ऍल्युमिनियमच्या वस्तूमध्ये सोफ्ढा सेट, खुर्ची, कपाट, टेबल, शोकेस, टीव्ही स्टॅण्ड तसेच स्वयंपाकघरातील काही प्रमुख वस्तूंचा समावेश असतो. नेहमी आपण या वस्तू शोरुम किंवा आस्थापनांमधून विकत घेतो. आपल्यासमोर काही ठराविक पर्याय असल्याने केवळ आपल्याला गरज असल्याने न आवडलेली वस्तूही आपण घेतोच. यावेळी त्याचा दर्जा किंवा किंमत पाहत नाही. जन्माष्टमीनिमित्त भरविण्यात आलेल्या फ्sढरीमध्ये अनेक पर्याय असल्याने आपल्याला आवडणारीच वस्तू त्याचा दर्जा पाहून आणि किंमत पाहून विकत घेऊ शकतो. एवढेच नाही तर या फ्sढरीमध्ये काही वस्तूंवर मोठय़ा प्रमाणात सवलतही देण्यात येईल अशी माहिती काही आस्थापनाच्या मालकांनी दिली आहे.

ज्याप्रमाणे मुलांसाठी विशेष कपडय़ांचे दालन आहे तशीच विशेष दालने आपण परिधान करणाऱया विविध वस्तुंचीही आहेत. सध्या युवकांमध्ये सनग्लासेसचे पेझ आहे हे लक्षात घेऊन वेशष चष्मांची अर्थात सनग्लासेसची दालनेही भरविण्यात आली आहे. ग्राहकांच्या गरजा जाणून घेऊन विविध प्रकारची दालने भरविण्यात आली आहे. मुलीं आपण सुंदर दिसाव्यात यासाठी अनेक उपाय करत असतात तर विविधि आस्थापनातून हव्या असलेल्या गोष्टीही विकत घेतो. यासाठी †िठकठिकाणी फ्ढिरावे लागते पण ही दालने एकाच ठिकाणी असल्याने त्याचा मोठय़ा प्रमाणात फ्ढायदा ग्राहकांना होणार आहे.