|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कला अकादमीत ‘ गाये मन मल्हार’ कार्यक्रमाला प्रतिसाद

कला अकादमीत ‘ गाये मन मल्हार’ कार्यक्रमाला प्रतिसाद 

प्रतिनिधी/ पणजी

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र नवी दिल्ली, स्पीक मॅके फाऊंडेशन नवी दिल्ली व कला अकादमी गोवा यांच्या सुंयक्त विद्यमाने आयोजित ‘गाये मन मल्हार’ या गायनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्तम दाद मिळाली. यावेळी मल्हार रागाचे सादरीकरण करण्यात आले. श्रृती साडोलिकर, पद्मश्री उल्हास कशालकर आणि व्यंकटेश कुमार यांनी यावेळी आपली गायकि सादर केली. त्यांना पं. सुरेश तळवलकर, पं. विश्वनाथ कान्हेरे, विश्वनाथ शिरोडकर, राया कोरगावकर, गुरुप्रसाद हेगडे, केशव जोशी या प्रतितयश कलाकारांनी साथसंगत केली.

या गायनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन कला व संस्कृती संचालनालयाचे संचालकतिथा कला अकादमीचे सदस्य सचिव गुरुदास पिळर्णकर यांनी केले तर याप्रसंगी पद्मश्री उल्हास कशालकर, पद्मश्री सुरेश तळवलकर, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या कार्यक्रम संचालक सुप्रिया कोन्सुल, तक्षशिल एज्युकेशन ट्रस्टच्या संजीव कुमार आणि स्पीक मॅकेच्या अध्यक्ष रशमी मळीक यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पं. कशालकर यांनी आपल्या गायनात ग्वालियर, आग्रा व जयपूर या घराण्याची गायकी सादर केली. श्रृती सडोलीकर यांनी शास्त्रीय गायन तर पं. एम. वेंकटेश कुमार यांनीही शास्त्रीय गायन सादर केले.