|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » Top News » केसगळतीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

केसगळतीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / म्हैसूर

हेअर स्टाईलमध्ये बदल केल्यानंतर केसगळतीची समस्या सुरू झाली म्हणून निराश झालेल्या म्हैसूरमधील एका विद्यार्थिनीनं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी विद्यार्थिनी बीबीएचा अभ्यास शिकत होती. काही दिवसांपूर्वी तिने म्हैसूरमधील एका पार्लरमधून हेअर स्टाइलमध्ये बदल केला. यानंतर काही दिवसांनी केसगळतीची समस्या उद्भवली. आपल्या डोक्मयावर आता एकही केस राहणार नाही की काय?, अशी भीती तिला भेडसावू लागली. केसगळतीच्या समस्येमुळे ती निराश झाली आणि चक्क तिनं जीवनयात्राच संपवली.

आत्महत्या करणाऱया मुलीच्या आईवडिलांनी पार्लरविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नेहा गंगमा असे आत्महत्या करणाऱया मुलीचे नाव आहे. नेहा ही गंगमा दाम्पत्याची एकुलती एक मुलगी. नेहाच्या आईने पोलिसांनी सांगितले की, केसगळतीच्या समस्येबाबत नेहानं फोनवर माहिती दिली होती. नवीन हेअर स्टाइलमुळे तिच्या केसांचा पोत बिघडला होता. यामुळे तणावात असलेल्या नेहाने कॉलेजमध्येही जाणे बंद केलं होते. हेअर ट्रिटमेंटमुळे त्वचेची ऍलर्जीदेखील झाल्याचा आरोप नेहाच्या आईनं केला आहे.