|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » एल्गार परिषद : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली : हायकोर्टने फटकारले

एल्गार परिषद : प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली : हायकोर्टने फटकारले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुणे पोलिसांनी नक्षली समर्थकांवर केलेल्या कारवाईवरुन मुंबई हायकोर्टाने पोलिसांना फटकारले. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली?, असा सवाल मुंबई हायकोर्टाने विचारला आहे.

एल्गार परिषदेप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. पुणे पोलिसांनी राजकीय दबावातून विचारवंतांना अटक केल्याचे याचिकाकर्त्यांचे  म्हणणे होते. गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये केलेल्या कारवाईचा तपास पोलिसांना करता येत नाही, त्यामुळे हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करावे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते.