|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » मुंबईत आतापर्यंत 10 गोविंदा जखमी

मुंबईत आतापर्यंत 10 गोविंदा जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई

दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह वाढताना पाहायला मिळत आहे. मात्र या उत्हासात आतापर्यंत 10 गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमी गोविंदांना उपचारासाठी जे. जे. आणि परळमधील के. ई. एम., मुलुंडच्या अगरवाल, सांताक्रूजच्या वि. एन. देसाई दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत 10 गोविंदा जखमी झाले असून 6 गोविंदांवर के. ई. एम. रुग्णालयात तर जे. जे. रुग्णालयात 2 आणि अगरवालमध्ये एक, वि. एन. देसाई रुग्णालयात 1 जखमी गोविंदांवर उपचार करण्यात आले. काहींना उपचार करून सोडण्यात आले तर काही गोविंदांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविराज गंगाराम चांदोरकर (वय 35) हे शिवडीतील कालेश्वर गोविंदा पथकाचा गोविंदा असून त्यांना प्लास्टर करून के.ई. एम. रुग्णालयातून सोडून देण्यात आलं आहे तर वडाळय़ातील श्री गणेश गोविंदा पथकातील जान्हवी जयवंत पाताडे (वय 14) हिला पायाला मार लागला असून के. ई. एम. रुग्णालयात तिच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले. तसेच श्री गणेश गोविंदा पथकातील मनाली सुधीर मेने (वय 18), शिवडीतील न्यू लेबर कॅम्प गोविंद पथकातील शंकर बाबुराव कागलाराम (वय 51), अमेय हिराचंद पाटील (वय 25) आणि मयूर महादेव नाईक (वय 26) हे वडाळय़ातील यश गोविंदा पथकातील गोविंदा आणि यज्ञ बाळकृष्ण मोरे (वय 17) यांच्यावर के. ई. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे काल खार दांडा सरावादरम्यान 14 वषीय चिराग पटेकर हा गोविंदा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खार येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज सकाळीच आमदार ऍड. आशिष शेलार यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन 1 लाखाची मदत केली आहे.