|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस कार्यकर्त्यांवर असिड हल्ला, 25 जखमी

काँग्रेस कार्यकर्त्यांवर असिड हल्ला, 25 जखमी 

ऑनलाईन टीम / बेंगुळुरू :

कर्नाटकमधील स्थानिक स्वाज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तुमकूर येथे काँग्रेस कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असतानाच त्यांच्यावरऍसिड हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात 25 जण जखमी झाले आहेत.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, तुमकूर येथे काँग्रेस कार्यकर्ते विजय साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते, तेव्हा हा ऍसिड हल्ला झाला. या हल्ल्यामागे कोण आहे, हल्ल्याचा उद्देश काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, आतापर्यंत जाहीर झालेल्या 2,267 जागांच्या निकालंमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसला 864, भाजपला 788 तर जेडीएस आणि अपक्षांना 277 जागांवर विजय मिळाला आहे.