|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » leadingnews » एनपीए आणि रघुराम राजन यांच्यामुळे घसरला होता देशाचा विकासदर : नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा

एनपीए आणि रघुराम राजन यांच्यामुळे घसरला होता देशाचा विकासदर : नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचा दावा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोटाबंदीमुळे नव्हे तर बँकांचा वाढलेला एनपीए आणि माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या धोरणांमुळे देशाच्या विकासदराला ब्रेक लागला होता, असा दावा नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे.

नोटाबंदीमुळे विकासदरात झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देताना राजीव कुमार म्हणाले की, “नोटाबंदीमुळे देशाचा विकासदर घसरला असा केला जाणारा दावा चुकीचा आहे. माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही नोटाबंदीमुळे विकासदर घसरल्याचा दावा केला होता. मात्र तुम्ही विकासदराच्या आकडय़ांचा आढावा घेतला तर तो नोटाबंदीमुळे नव्हे तर त्याआधीच्या सहा तिमाहींपासून खाली येत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. याची सुरुवात 2015-16 मधील दुसऱया तिमाहीपासून झाली होती. जेव्हा विकासदर 9.2 एवढा होता. त्यानंतर प्रत्येक तिमाहीत हा विकासदर कोसळत गेला. त्याला नोटाबंदी हे कारण नव्हते. घसरता विकासदर आणि नोटाबंदी यामध्ये प्रत्यक्ष संबंध असल्याचा कुठलाही पुरावा मिळालेला नाही.’’

 

Related posts: