|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » विविधा » दुबईच्या विश्व साहित्य संमेलनात पुण्यातील बालकलाकारांचे गीतरामायण

दुबईच्या विश्व साहित्य संमेलनात पुण्यातील बालकलाकारांचे गीतरामायण 

ऑनलाईन टीम / पुणे :

‘आकार’ संस्थेच्या 10 बालकलाकारांचा सहभाग

मराठी साहित्य परिषदेच्या दुबई येथे होणाऱया 8 व्या विश्व साहित्य संमेलनात पुण्यातील ‘आकार’ संगीत वर्गाच्या बालकलाकारांचा गीतरामायणचा कार्यक्रम होणार आहे. 9 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.

साहित्य संमेलनात आकारचे 10 बालकलाकार सहभागी होणार आहेत. मधुश्री हजारनवीस, राधा कुलकर्णी, श्रीनिधी गायकवाड, आर्या कुलकर्णी, मैथिली परचुरे, राजलक्ष्मी देशमुख, पार्थ पगारिया, अस्मी देशपांडे आणि नरेंद्र शिंदे हे बालकलाकार यामध्ये गीतरामायण सादर करणार आहेत. गेल्या 3 महिन्यांपासून या गीतरामायणाची तयारी ही मुले करत असल्याची माहिती आकारच्या संस्थापिका सौ. चित्रा देशपांडे यांनी सांगितले. गीतरामायणातील 12 गीते हे बालकलाकार सादर करणार आहेत. आकारतर्फे यासाठी विशेष स्वरचाचणी घेण्यात आली आणि त्यातून या बालकलाकारांची निवड करण्यात आली. याआधीही बँकॉक येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनात आकारचे बालकलाकार सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी सावरकर गीते सादर केली होती.