|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » महान राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराज

महान राष्ट्रसंत तरुणसागरजी महाराज 

कडवे प्रवचनकार, अहिंसेचा संदेश देणारे चिदानंद बालब्रह्मचारी, महायोगी, सिद्धसंत, ज्ञानसागर, ज्ञानप्रदाता, आनंददाता, आत्मज्ञानी, छोटी मूर्ती कीर्ती मोठी, संत, एक आदर्श शिष्य आणि गुरुप्रमाणे महान राष्ट्र संत पूज्य गुरुवर 108 मुनी तरुण सागरजी महाराज यानी 8 मार्च 1981 ला गृहत्याग केला. गुरु आचार्य 108 पुष्पदत्त सागरजीकडून त्यांच्या वाणीमधून जीवनाचे रहस्य जाणले. ब्रह्मचर्य व्रताची दीक्षा गुरुवरांच्याकडून घेतली. 18 जानेवारी 1982 ला अकलतरा छत्तीसगढमध्ये युगसंत आचार्य पुष्पदत्तसागर यांच्या मार्गदर्शनात मुनी दीक्षा घेतली. 13 वर्षाच्या आयुष्यात जैनमुनी बनणारे ते प्रथम योगी होत. लाल किल्ला (दिल्ली) वरून प्रथम राष्ट्रसंत म्हणून देशाला संबोधन-प्रवचन केले. जीटीबी माध्यमातून भारत व इतर 122 देशात महावीरवाणीच्या विश्वव्यापी प्रसारणाची ऐतिहासिक सुरुवात केली.

पूज्य तरुणसागर महाराज कत्तलखाने व मांस-निर्यात विरोधी अहिंसात्मक राष्ट्रीय आंदोलन करत होते. तीन डझनाच्या वर पुस्तके उपलब्ध व त्यांच्या वीस लाखाच्या वर प्रतीची विक्री झाली. मुख्य पत्र ‘अहिंसा महाकुंभ’ मासिकाचे प्रकाशन फरिदाबाद (हरियाणा) येथून होते. क्रांतिकारी संत मुनीश्री तरुणसागरजीनी 23 व्या वषी साधना व ज्ञान आराधनानंतर 47 दीक्षार्थी, आर्थिकायाना पंचवटी सोसायटी पुणे-महाराष्ट्रमध्ये 18 जानेवारी 2005 रोजी गुरुमंत्र देण्याची नवी परंपरा सुरुवात केली. गुरुशिवाय जीवन अधुरे असते. जीवनात एका गुरुची आवश्यकता आहे. गुरु आदर्श चारित्र्यवान असावा. दरवषी हजारो दीक्षार्थी गुरुमंत्र दीक्षा घेत होते. पूज्यश्रीचा हा प्रयोग आदर्श गृहस्थ, आदर्श नागरिक व आदर्श श्रावक व श्राविका बनवणेचा नवीन अभिनव प्रयोग होता. चारित्र्यवान नीतिवान, आदर्श व्यक्तीच भगवान बनू शकते. चारित्र्य हाच खरा धर्म आहे.

पूज्य तरुण सागरजी महाराजांनी ‘राजकीय अतिथी’ म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आदी अनेक राज्यांसह देशभर विहार केला. देशात सर्वाधिक ऐकणारे व वाचणारे दिल व दिमागला उत्साहित, आनंदित करणारे कडवे प्रवचन भगवान महावीर आणि त्यांचा संदेश ‘जगा आणि जगू द्या’ याचा विश्वव्यापी प्रचार प्रसार करणारे गुरु ‘जैन एकता’साठी प्रखर संघर्ष व प्रयत्न करणारे महान संत होते. जैनधर्माचे पुनरुज्जीवक महाराज होते. सर्व धर्मीयांचे ते आदरणीय स्थान होते.

पूज्य तरुणसागरजी म्हणतात, ‘जीवनात खरी दौलत आहे ती म्हणजे आईवडील होत. मातापितापेक्षा श्रे÷ कोण नाही. आमचे मातापिता आम्हाला जन्म देतात. आपण उपाशी राहून आम्हाला लहानाचे मोठे करतात. आपले स्वतःचे भविष्य खराब करतात. मुलांचे कर्तव्य आहे की त्यांना दु:ख, दर्द देऊ नये. परिस्थिती कसलीपण असू द्या, आपण कसे जगावे वडील शिकवत नाहीत. कसे जीवन जगावे हे स्वतः आचरणातून दाखवितात. पिता मुलाला चांगले ओळखत असतात. पिता मातेप्रमाणे आंधळे प्रेम करत नाही. मुलगा चांगला व्हावा म्हणून प्रसंगी कठोर होतात. कठीणप्रसंगी आपल्यासोबत असतात. आपण चुकीचे वागत असाल तर साथ देत नाहीत. पिता आपणास खरे प्रेम, त्याग, धैर्य देण्याचे साहस करतात. मातेचे प्रेम कर्तव्यनि÷, मदतगार, साहस प्रत्येक व्यक्तीसाठी श्रे÷ आहे. संत एक महान दिवाकर आहे. संत सूर्यप्रकाश देतात, त्याप्रमाणे आपल्या ज्ञानप्रकाशाने लोकांच्या अंतःकरणात ज्ञानाचा दिवा लावतात.

मुनीश्री तरुणसागरजी महान क्रांतिकारी संत होते. ते विकृत परंपरांच्या नाशासाठी हिंसा, क्रूरता व कत्तल विरोधी क्रांतीची मशाल घेऊन आले होते. प्रत्येक जाती धर्माची व्यक्ती मुनीश्रींच्या प्रवचन सभामध्ये श्रद्धा भक्तीने येत होती. ते मनुष्यजीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकत होते. मुनीश्री हरफनमौला व अजीज फकीर होते. त्यांच्या प्रवचनांच्यावेळी मंडपव्यवस्था कमी पडत होती. जैन दर्शनमधील अनेकात अहिंसा व अपरिग्रह सिद्धांतांना साध्यासरळ भाषेत लोकांच्या अंतःकरणात उतरवीत. 30 नोव्हेंबर 1997 रोजी मुनीश्रीनी मांसनिर्यात व कत्तलखाने विरोधी देशव्यापी अहिंसा रॅलीला लाल किल्ला दिल्लीमधून संबोधन केले.

महान संतांमध्ये चार विशेषतः असतात. त्याग, संयम, वैराग्य व आसक्ती असत नाही. संयम सकामी योगीसुद्धा करतो. मन इंद्रियावर संयम केल्याशिवाय समाधी होत नाही. संयमाचा अर्थ वशमध्ये ठेवणे. संयम म्हणजे आपल्या इंद्रियाना वशमध्ये ठेवणे, विषयापासून दूर राहणे. राग, क्रोधाचा अभाव, धनसंपत्ती, इच्छारहित, सांसारिक पदार्थापासून आसक्ती नाही. लोभमोहापासून अलिप्त असा मानवच संयमी व साधूतेस पात्र आहे. तरुणसागर खरे सद्गुरु होते. क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुणसागर यांना मोक्ष सुखाची प्राप्ती होऊ दे.

देशविरोधी नारे देणारे देशभक्त नाहीत. विद्यार्थ्याचे काम अभ्यास करणे आहे. शिक्षण सोडून देशविरोधी कारवाया करणे नाही. देशाविरोधी कारवाया करणारे अस्तनीतले निखारे, आस्तिन के साप आहेत. त्यांना वेळीच कुचला नाहीतर देशासाठी हे लोक खतरनाक आहेत.

संत व संसारी यात बुनियादी अंतर आहे. संतांनी भगवंताला प्राप्त करण्यासाठी दुनिया, घरदार सोडले. संसारीने दुनियेला प्राप्त करण्यासाठी भगवानाला सोडले. भगवानप्राप्ती सर्वश्रे÷. त्यासाठी दुनियेचा त्याग करा, पद आणि पैसा परमात्म्यासाठी सोडा, पण पद आणि पैशासाठी परमात्म्याला सोडू नका. दुनिया, पद, पैसा सुटणारच आहे.

ज्या प्रभूची आपण उपासना, भक्ती करतो त्याच्या पसंदीचा विचार करा. प्रभूला प्रेमयुक्त डोळे, श्रद्धेने झुकलेले डोके, सहयोग करणारे हात, सन्मार्गी पाय, सत्यवचनी जीभ पसंत आहे. प्रभूला घमंडी डोळे, दुसऱयाचा हक्क नष्ट करणारे हात, चुकीच्या मार्गी जाणारे पाय, खोटी साक्ष देणारा मानव पसंद नाही.

संत असो वा संसारी, प्रत्येकाला एक दिवस जायचे आहे. दोघांच्या जाण्याच्या मार्गात फरक आहे. संसारी जाताना संतानाला मृत्यूपत्र लिहून ठेवून जातो. संत जाताना समाजाला संदेश देऊन जातो. संत मुनी समाजाला लुटत नाही तर तो लुटला जातो. संत समाजाला खूप भरभरून देतो व समाजाकडून तीळभरच घेतो. एकवेळ जेवण करतो. जो दुसऱयांना लुटतो तो लुच्चा आहे. जीवन अर्पण करणारा सच्चा आहे.

दिगंबर मुनी पायात चप्पल, डोक्मयावर छत्री, परिवाराशी नाते आणि बँकमध्ये खाते काढत नाही. इंद्र त्याचा सखा, तन तपाने तापलेले, मन दुनियासे थकलेले, वैरागीभावाने युक्त पाहिजे, सोटा लोटावाले साधू मिळतील पण पिंछी, कमंडलूधारी साधू मिळत नाहीत. भाग्यानेच मिळतील. मुनी मौन व्रतधारी असतील त्यांची मुद्रा उपदेश देते. पतीचे नाव शंकर असले तरी तांडव पत्नीच करत असते. आज राष्ट्रसंत तरुणसागर महाराज आपल्यात नाहीत पण त्यांची कडवीरूपी प्रवचन वाणी आपल्या अंतापर्यंत स्मरणात राहील. न भूत्तो न भविष्यती असे तरुणसागर महाराज अमर राहोत.

सुरेश जोलापुरे