|Thursday, November 15, 2018
You are here: Home » उद्योग » 132 कोटी जीएसटी जाहिरात खर्च

132 कोटी जीएसटी जाहिरात खर्च 

नवी दिल्ली

 वस्तू आणि सेवा कराच्या जाहिरातीसाठी सरकारकडून 132.38 कोटी रुपये खर्च करण्यात आले. छपाई माध्यमांत 1,26,93,97,121 रुपये खर्च करण्यात आल्याचे ब्युरो ऑफ आऊटरिच ऍण्ड कम्युनिकेशन्सकडून सांगण्यात आले. हा विभाग माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असून आरटीआयअंतर्गत ही माहिती मिळाली आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांत जाहिरातीसाठी किती खर्च करण्यात आला याची माहिती देण्यात आलेली नाही. जीएसटीसंदर्भात जागृती करण्यासाठी हा पैसा खर्च करण्यात आल्याचे सरकारने म्हटले. 1 जुलै 2017 रोजी जीएसटी प्रत्यक्षात लागू करण्यापूर्वी सरकारने अनेक प्रसारमाध्यमांत नव्या करप्रणालीसंदर्भात जागृती करण्यासाठी आणि नियमावलीसाठी जाहिराती दिल्या होत्या. जीएसटीसाठी सरकारने प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छादूतपदी नियुक्ती केली होती. व्यापारी आणि उद्योजकांच्या माहितीसाठी या जाहिराती देण्यात आल्या होत्या.

Related posts: