|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गोविंदा रे …गोपाळा!

गोविंदा रे …गोपाळा! 

जिल्हाभर दहीहंडीचा उत्साह

मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी चुरस

प्रतिनिधी /रत्नागिरी

बोल बजरंग बली की जय! ….‘गोविंदा आला रे आला’… ‘गोविंदा रे गोपाळा’ च्या जयघोषात जिल्हय़ाच्या विविध भागात ढाक्कुमाकुमच्या तालावर ठेका धरत अनेक गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी सोमवारी रस्त्यावर उतरली. पाच, सहा थरांचे मानवी रचून अनेक मंडळांनी दिलेल्या सलामीने रसिकांची मने जिंकली. मात्र मानाच्या व मोठय़ा बक्षीसाच्या दहीहंडीचा थरार रात्री उशीरापर्यंत सुरू होता. दरम्यान, दहीहंडीच्या डिजेवरील निर्बधामुळे लाऊडस्पीकर आणि ढोल-ताशाची साथीने उत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला होता.

जिल्हय़ात 234 सार्वजनिक तर 3040 दहीहंडी सोमवारी उभारण्यात आल्या होत्या. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विविध राजकीय पक्षांनी मोठय़ा बक्षीसांच्या हंडय़ा उभारल्या आहेत. राजकीय पक्षांच्या हंडय़ांबरोबरच मानाच्या हंडय़ा फोडण्यासाठी गोपाळांमध्ये मोठी चुरस दिसून आली. हंडीच्या उंचीबरोबरच बक्षीसांमध्येही वाढ झाली असल्याने हा उत्साह अधिकच वाढलेला दिसून आला.

गोविंदाच्या या उत्साह द्विगुणीत करण्यासाठी आवश्यक असलेल्या वरूणराजाने यादिवशी विश्रांती घेतली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी गोविंदांना चिंब करण्यासाठी पाण्याचा वर्षाव करण्याची वेळ आली होती. कुठे ढोलताशांचा गजर, कुठे नियम पाळून डिजेचा तालही धरण्यात आला होता. एकंदरीत रत्नागिरीत नियमांचे पालन करून मानाच्या दहिहंडय़ाच्या ठिकाणी सलामी दिल्या व दहिहंडय़ा फोडण्याचा मान पटकावला.

Related posts: