|Saturday, November 17, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » रुग्णालयात श्वान, डासांनी लालूप्रसाद यादव हैराण

रुग्णालयात श्वान, डासांनी लालूप्रसाद यादव हैराण 

पाटणा

 चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यावर रांची येथील इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (रिम्स) उपचार सुरू आहेत. श्वानांचे भुंकणे आणि डासांमुळे रात्री झोप लागत नसल्याची तक्रार लालूंनी रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे. लालू यांच्या या तक्रारीवर संजदने खोचक टिप्पणी केली आहे. राजदच्या शासनकाळात देखील बिहारची जनता अत्यंत भयभीत होती, असे संजदने म्हटले आहे.

लालूप्रसाद यांनी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पेइंग वॉर्डमध्ये स्वतःला हलविण्याची मागणी केली आहे. रुग्णालयात डास असल्याने डेंग्यूची लागण होण्याची भीती असल्याचे लालू यांनी म्हटले आहे. मागील आठवडय़ात झारखंड उच्च न्यायालयाने लालूप्रसादांचा जामीन वाढविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळल्याने त्यांना पुन्हा तुरुंगात जावे लागले होते. या अगोदर ते मुंबई येथे उपचार घेत होते. मुंबई येथून परतल्यावर लालूप्रसादांनी सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर समर्पण केले होते.

Related posts: