|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सैनिक टाकळीमध्ये भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्याकडून वह्या वाटप

सैनिक टाकळीमध्ये भवानीसिंह घोरपडे सरकार यांच्याकडून वह्या वाटप 

वार्ताहर/ सैनिक टाकळी

येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व  गर्ल्स हायस्कूलमध्ये शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानीसिंह घोरपडे सरकार यांनी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप केल्या. गेली कित्येक वर्षांपासून घोरपडे सरकार खिद्रापूर, टाकळीवाडी, दत्तवाड, अब्दुललाट, दानवाड या गावांमधून माध्यमिक, प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी साहित्य वाटप करत आहेत. कार्यक्रमास दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांचेसह विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.