|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापूरमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा सामंजस्य करार

सोलापूरमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा सामंजस्य करार 

प्रतिनिधी/ सोलापूर

स्मार्ट शहराच्या दिशेने झेपावणाऱया सालपूरच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. सोमवारी स्पेनमधील मुर्शिया आणि सोलापूर या दोन शहरांमध्ये माहिती व तंत्रज्ञान आदान-प्रदानाचा करार झाला. या करारामुळे सोलापुरातील इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीत हे शहर स्मार्ट होण्याबद्दलच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सोलापूरच्या शहराच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक असलेली ही गुड न्यूज महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्पेन येथून प्रसारमाध्यमांमध्ये दिली.

  सोलापूरचे शिष्टमंडळ सध्या स्पेनमधील मुर्शियाबाद येथे मुक्कामी आहेत.  याअंतर्गत  सोमवारी  मुर्सिया शहराचे महापौर डॉ. जोस ब्लेस्टा जर्मन यांनी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, तसेच नगरअभियंता संदीप कारंजे यांचे स्वागत करण्यात केले. याच दरम्यान सोलापूरच्यावतीने महापौरांनी मुर्शिया शहराचे महापौर डॉ. जोस ब्लेस्टा यांचा भारतीय संस्कृतीनुसार सत्कार करण्यात केला.

    त्यानंतर  येथे परिषद घेण्यात आली. सदर परिषदेमध्ये मुर्शिया आणि  सोलापूर शहराबाबत माहिती सादर  करण्यात आली.   तसेच मुर्शिया व सोलापूर शहरांचे धोरणाबाबत चर्चा करण्यात आली. सदर चर्चेमध्ये दोन्ही शहराचे महापौरांनी माहिती व तंत्रज्ञान यांची आदान-प्रदान करण्याबाबतही संमती दर्शविली.