|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राईनपाडय़ानंतर आता सरकारकडूनही पिडीतांवर अन्याय

राईनपाडय़ानंतर आता सरकारकडूनही पिडीतांवर अन्याय 

प्रतिनिधी/ सोलापूर

लहान मुले पळवणारी टोळी समजून धूळे जिह्यातील राईनपाडा येथील नागरिकांनी मंगळवेढय़ातील भटक्या विमुक्त जातीतील पाचजणांना ठेचून मारून त्यांच्यावर पहिल्यांदा अन्याय केला. तद्नंतर आता पिडीतांना सावरताना मदतीची ओंजळ भरून  दिलासा देण्याऐवजी मायबाप सरकार त्यांची हेळसांड करून त्यांच्या कुंटुंबीयांवर दुसरा अन्याय करत असल्याची स्थिती राईनपाडा प्रकरणात होत असल्याचा आरोप सोमवारी  पिडीतग्रस्तांनी सोमवारी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यापुढे केला. मुख्यंत्र्यांनी केवळ दहा लाखांची मदत देवून बोळवण केली. मात्र  अन्य मदत करण्याची जी आश्वासने दिली होती त्यांची पुर्तता मात्र होत नाही असे गाऱहाणे यावेळी मांडण्यात आले.मदतीसाठी मागील दोन महिन्यांपासून सरकरी कचेरींची वाट पांढरी करत आहोत तरीही मदत मिळत नसल्याचे पिडीतग्रस्तानी जिल्हाधिकाऱयांना सांगितले

     नागपूरच्या अधिवेश्नात मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी पिडीत कुटूंबीयांच्या पुर्नवसनबाबतीत जी आश्वसने दिली होती. ती हवेतच हिरली आहेत. याप्रकरणी पिडीत कुटूंबीयांची सरकारी कचेऱयाची उंबरटे झिझवत झिझवत ससेहोलपट होतेय पंरतु मुख्यमंत्र्याना भेटीसाठी वेळ देत नाहीत. यामुळे निधी दिलात पण आमचे पुर्नवसन कधी करणार असाच सवाल पिडीत कुटूंबीयांनी यावेळी उपस्थित केला.

  एक जुलै रोजी धुळे जिह्यातील राईनपाडा प्रकरणाला होउढन दोन महिने उलटले गेले. मात्र नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, पारधी पुनर्वसन आराखडय़ात नाथ पंथी डावरी समाजासाठी बृहतआराखडा करून त्यांचे पुनर्वसन करू. त्यांना जमिन, नोकरी आणि राहण्यासाठी घर देऊ अशी आश्वसने दिला.r मात्र त्यांची पुर्तता होत नसल्याचे  संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी तरूण भारत संवादशी बोलताना सांगितले.

   मागील दोन महिन्यापासून मुख्यंमंत्र्याच्या भेटीसाठी वेळ मागतोय मात्र वेळच मिळत नाहा.r त्यामुळे भटक्या विमुक्त जमातीतील कुटूंबाना निधी मिळाला मात्र त्यांचे पूर्णपणे पूनर्वसन अद्यापही झालेले नाही. त्यामुळे आमचे पुनर्वसन करा तसेच हत्या करणाऱया शासनाने अद्याप कोणतेही कारवाई केलेली नाही. त्यामुळे हत्या करणाऱया मारेकऱयांवर कारवाई करा या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना सोमवारी देण्यात आले.

        ‘मॉबलिचींग’ नावाखाली राईनपाडा प्रकरण दडपण्याचा प्रकार

याप्रकरणी अद्यापही पोलिस प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. त्यांना विचारल्यास 19 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले मात्र कारवाई झालेली नाही. याप्रकरणी मॉबलिचींग म्हणून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले यांच्यासह पिडीतांनी केला.