|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर 200 जाणांच्या तडीपारीचे प्रस्ताव

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमिवर 200 जाणांच्या तडीपारीचे प्रस्ताव 

प्रतिनिधी/ सांगली

गणेशोत्सव आणि मोहरमच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी जिल्हय़ातील 200 जणांच्यावर तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यामध्ये 20 टोळय़ांचा समावेश आहे. तर 150 जणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

 या महिन्यात गणेशोत्सव आणि मोहरम असे दोन सन साजरे होत आहेत. या काळात जिल्हय़ात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न उदभवू नये यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत 150 जणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून यामध्ये 69 जणांच्याकडून उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवेल असे कोणतेही कृत्य करणार नसल्याचे बाँडवर लेखी घेतले आहे.

याशिवाय हद्दपारीची कारवाईही करण्यात येणार आहे. यामध्ये 65 जणांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱयांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. तर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्हय़ातील 20 टोळय़ातील सुमारे 100 हून अधिक जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव तयार केली असून त्याची सुनावनी सरू आहे.  उत्सावांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी जिल्हय़ात ठिकठिकाणी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. इस्लामपूर, तासगाव, विटा, जत या ठिकाणी बैठका घेण्यात येणार आहेत. प्रलंबित गुन्हय़ासह सर्व आढावा या निमित्ताने घेण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले.