|Friday, November 16, 2018
You are here: Home » Top News » पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरूच

पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरूच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईतपेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत मंगळवारी (4 सप्टेंबर) पेट्रोल 16 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 20 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 86.72 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 75.74 झाला आहे. याआधी मुंबईत सोमवारी पेट्रोलचा सर्वाधिक दर म्हणजेच प्रतिलिटर 86.56 इतका होता. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोल 16 पैसे तर डिझेल 19 पैशांनी प्रतिलिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 79.31 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 71.34 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.

 

 

Related posts: