|Saturday, November 17, 2018
You are here: Home » Top News » 48 रूपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचे शोषण : सुब्रमण्यम स्वामी

48 रूपयांपेक्षा महाग पेट्रोल म्हणजे जनतेचे शोषण : सुब्रमण्यम स्वामी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पेट्रोलचे दर जास्तीत जास्त 48 रुपये प्रति लिटर असायला हवेत. सरकार लोकांकडून यापेक्षा जास्त पैसे लोकांकडून वसूल करत असेल, तर ते शोषण आहे, असे म्हणत भाजपाचे राज्यसभेतील सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी हे वक्तव्य केले आहे.

आज मुंबईत पेट्रोलचा दर 86.72 रुपये प्रति लिटर इतका आहे. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे आता भाजीपाल्यासह सर्वच वस्तूंचे दर वाढण्याची शक्मयता आहे. यावरुन सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. पेट्रोलचे दर 48 रुपयांपेक्षा अधिक वाढवले जाऊ नयेत. सरकार यापेक्षा जास्त किंमत जनतेकडून वसूल करत असेल, तर ती सर्वसामान्यांची लूट आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी यांनी इंधन दरवाढीवरुन सरकारचा समाचार घेतला.

 

Related posts: