|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » 48 टक्के लोकांचा मोदींना पाठिंबा, प्रशांत किशोर यांच्या संस्थेचे सर्वेक्षण

48 टक्के लोकांचा मोदींना पाठिंबा, प्रशांत किशोर यांच्या संस्थेचे सर्वेक्षण 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास कायम असून देशाला पुढे नेण्यासाठी सक्षम नेता म्हणून 48 टक्के लोकांनी मोदींनाच पसंती दर्शवली आहे. प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटी (आय- पॅक) या संस्थेच्या ऑनलाइन सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

 

इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटीने 55 दिवसांत 712 जिह्यांमधील 57 लाख लोकांचे मत जाणून घेतले. ऑनलाइन सर्वेक्षणाच्या माध्यमातून हे मत जाणून घेण्यात आले. यात लोकांना 923 नेत्यांचा पर्याय उपलब्ध होता. यात देशाला पुढे नेण्याची क्षमता असलेला नेता म्हणून लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारडय़ात मत टाकले. तब्बल 48 टक्के लोकांनी मोदींना मत दिले आहे. राहुल गांधी 11 टक्के मतांसह दुसऱया तर अरविंद केजरीवाल 9.3 टक्के मतांसह तिसऱया स्थानी आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हे सात टक्के मतांसह चौथ्या स्थानी आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 4.2 टक्के मतांसह पाचव्या आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती 3.1 टक्के मतांसह सहाव्या स्थानी आहेत.