|Monday, July 22, 2019
You are here: Home » Top News » मालेगाव बॉम्बस्फोट : पुरोहितांना सुप्रीम कोर्टाचा दणका

मालेगाव बॉम्बस्फोट : पुरोहितांना सुप्रीम कोर्टाचा दणका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशीची मागणी करणाऱया याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रिम कोर्टाने आज नकार दिला असून मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल श्रीकांत त यांच्यावर आरोप निश्चित करण्याला स्थगिती देण्याची मागणी फेटाळून लावली आहे.तसेच याबाबतचा अर्ज सत्र न्यायालयात दाखल करावा अशा स्पष्ट सूचना सुप्रिम कोर्टाने याचिकाकर्त्याला दिल्या आहेत

ज्येष्ठ न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर आज याप्रकरणाची सुनावणी करण्यात आली. खंडपीठाने याचिकाकर्त्याची मागणी फेटाळून लावत त्यांना सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. कर्नल पुरोहित यांच्या याचिका याआधीच मबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. पुरोहितने कनिष्ठ कोर्टाकडून आरोप निश्चिती करण्याला स्थगिती देण्याची मागणी हायकोर्टाकडे केली होती. बेकायदा कारयावा प्रतिबंध कायद्यानुसार आरोपांवर ट्रायल कोर्टाकडूनच निर्णय दिला जाईल. कर्नल श्रीकांत पुरोहितने याचिकेमध्ये आपल्यावर लावण्यात आलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याला आव्हान दिले होते. दरम्यान, आपल्याला यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱयांची विशेष तपास पथक नेमून चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्याला सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले.