|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » देवळा मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात ; 4 ठार,15 जखमी

देवळा मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात ; 4 ठार,15 जखमी 

ऑनलाईन टीम / नाशिक

तालुक्यातील भाबडबारीत येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी आहेत. जखमींना जवळील सिव्हील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नंदूरबारहून एमएच 20 बीएल 2310 ही बस नाशिककडे निघाली होती. त्यावेळी समोरून येणाऱया म्हणजेच नाशिकहून नंदूरबारकडे जाणाऱया पीएन 52 जेजे 053 या ट्रकला ही बस धडकली. या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले आहेत. देवळा तालुक्मयातील विंचूर शहादा प्रकाशा महामार्ग बावडेफाटाजवळ हा अपघात घडला आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून मृतांची ओळख पटविण्यचे काम सुरु आहे. सध्या, अपघातातील दोन जखमींची ओळख पटली आहे. दीपक कुलकर्णी रा अकोला (जि.नगर) आणि राहुल देवरे (सटाणा,जि.नाशिक) अशी मृतांची नावे आहेत.

Related posts: