|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » थुंकलेल्या भिंती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या साफ

थुंकलेल्या भिंती स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या साफ 

ऑनलाईन टीम / अकोला :

अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांची अकोल्यात चर्चा आहे. सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकणाऱया पिचकारीवीरांच्या मानसिकतेच्या कानफटात मारल्या गेली आहे.

जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी काल अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी कार्यालयातील भिंती पान, तंबाखूच्या पिचकाऱयांनी रंगलेल्या दिसल्या. मग, जिल्हाधिकाऱयांनी स्वतः बकेट आणि पाणी घेत ती भिंत साफ करायला सुरूवात केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारीकर्मचाऱयांवर चांगलीच वेळ आली. या कार्यालयातील अस्वच्छतेसंदर्भात जिल्हाधिकाऱयांनी संबंधितांना चांगले धारेवर घेतले. आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेतली. अकोला शहरासह जिह्यातील रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे या कार्यालयाच्या कार्यप्रणालीवर जनतेचा मोठा रोष आहे. कामातील बेफिकीरीची स्थिती या कार्यालयाच्या वातावरणातही पहायला मिळाली. दस्तुरखुद्द अकोला जिल्हाधिकाऱयांना ही परिस्थिती पाहायला मिळाली आणि स्वच्छतेसाठी ते स्वतःच पुढे सरसावले. पान, तंबाखू खाऊन थुंकल्यामूळे रंगलेल्या भिंती, कार्यालयात झालेले कोळय़ांचे जाळे, धुळीने माखलेल्या फाईल पाहून जिल्हाधिकाऱयांचा पारा चढला. जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी थेट बकेट, पाणी आणि कापड मागवत स्वतः पिचकाऱयांनी रंगलेली भिंत स्वच्छ करायला सुरूवात केली. कार्यालयातील भिंत स्वतः जिल्हाधिकारी साफ करत असल्याचे बघताच, कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी तेथे जमले. जिल्हाधिकाऱयांनी स्वतः भिंत साफ करायला सुरु केल्यानंतर काय करावे ते कर्मचाऱयांनाही समजेना झाले.

Related posts: