|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मालाडमध्ये इमारतीत लागलेली आग आटोक्यात

मालाडमध्ये इमारतीत लागलेली आग आटोक्यात 

ऑनलाईन टीम / मुंबई

मालाडमधील बॉम्बे टाकीज परिसरातील इमारतीमधील एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 11 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मालाड पश्चिमेकडील एन. एल. रोडवरील सोमवार बाजार परिसरात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. लाकडाच्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती येथील प्रत्यक्षदर्शींनी दिली. सोमवार बाजार परिसरातील वाहतूक थांबवण्यात आली आहे. आगीनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आहेत. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांच्याशिवाय या ठिकाणी अन्य वाहनाला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच रिक्षा आणि बसची वाहतूक वळवण्यात आली आहे. तसेच हा परिसर रहिवासी आणि व्यावसायिक परिसर आहे. या ठिकाणी मोठय़ प्रमाणात लाकडी वस्तूंची दुकाने आहेत. ही आग पसरू नये यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Related posts: