|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर 

जि.प.अध्यक्ष स्वरूपा साळवी यांची घोषणा

आज शिक्षकदिनी होणार पुरस्कार वितरण

प्रतिनिधी  /रत्नागिरी

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले असून प्रत्येक तालुक्यातून एक असे नऊ शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. जि. प. अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली. बुधवारी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी या आदर्श शिक्षकांना गौरवण्यात येणार आहे.

पुरस्काराप्राप्त आदर्श शिक्षकांमध्ये सुहाजी गुणाजी रांगले (उपशिक्षक प्राथ. शाळा गांधीचौक, मंडणगड) सुभाष सहदेव काताळकर (पदवीधर शिक्षक, चिखलगाव दापोली), संतोष दत्ताराम जाधव (पूर्ण प्राथ. शाळा धामणदेंवी खेड), संजय गोकुळ सोनवणे (मुख्याध्यापक, कुंभार्ली नं. 1 चिपळूण), रविंद्र रामचंद्र कुळये (पदवीधर शिक्षक, शाळा शिवणे नं.1 गुहागर), प्रकाश धोंडू गेल्ये (उपशिक्षक, आदर्श शाळा कुळे संगमेश्वर), मैथिली संदेश लांजेकर (उपशिशिका प्राथमिक शाळा पावस नं. 1 रत्नागिरी), सुहास रमाकांत वाडेकर (पदवीधर शिक्षक, भडे नं. 1 लांजा) आणि तानाजी नारायण मासये (उपशिक्षक प्राथमिक शाळा कारवली नं. 2) यांचा समावेश आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी तालुकास्तरावरून एकूण 20 प्रस्ताव दाखल झाले होते. जि. प. अध्यक्ष स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष गोवळे, सर्व खात्यांचे सभापती, सीईओ आंचल गोयल, प्राथमिक शिक्षणाधिकारी डी. बी. कुल्हाळ, डाएट प्राचार्य यांच्या समितीकडून मुलाखती व पडताळणी करण्यात आली. यावेळी पाच शिक्षक मुलाखतीवेळी गैरहजर राहिल्याने 15 शिक्षकांमधून 9 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

आदर्श शाळा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बुधवार 5 सप्टेंबर रोजी जि. प. च्या शामराव पेजे सभागृहामध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरूपा साळवी, मुख्य कार्यकारी आंचल गोयल यांच्यासह सर्व सभापती व अधिकारी उपस्थित राहणार आहेत.