|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » विदेशातील गुंतवणुकीत भारतीय कंपन्याची घसरण

विदेशातील गुंतवणुकीत भारतीय कंपन्याची घसरण 

जुलैमध्ये 36 टक्क्यांची घसरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय कंपन्याकडून विदेशातील उद्योगामध्ये करण्यात येणाऱया गुंतवणुकीत यदा घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 जुलै 2018 मध्ये यात 36 टक्क्यांची घसरण  झाली असून ती 1.39 अब्ज डॉलर्स पर्यत पोहोचली आहे. आरबीआय बँकेने हा  सादर केलेल्या अहवालातून खुलासा केला आहे.

भारतीय कंपन्यानी परदेशात संयुक्त आणि सहयोगी योजनाचा आधार घेत समभाग  आणि विश्वासर्हतेच्या जोरावर  2.17 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक  केली होती. यात जून 2018 ला विदेशी योजनेत देशाअंतर्गत 2.07 अज्ब डॉलर्स पर्यत गुंतवणूक करण्यात आली होती.

 प्रमुख गुंतवणुकीत सीरम इंडस्ट्रीज ऑफ इंडिया यांनी नेंदरलँडचा हक्क असणाऱया कंपनीला 18.739 कोटींची गुंतवणुक करण्यात आली होती. याच बरोबर स्टर्रलाईट टेक्नालॉजी यांनी इटलीत 6.667 कोटी डॉलर्सची गुंतवणुक केली होती. तर इंटर ग्लोबल एटरप्राईजस  कंपनीने ब्रिटनमध्ये 5.465 कोटी डॉलर्स आणि जेएसडब्ल्यु स्टील यांनी अमेरिकेत 5.047 कोटींची गुंतवणुक केली होती.

चालू आकडेवारीनूसार भारतीय कंपन्याच्या गुंतवणुकीत मोठी घसरण झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.