|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » एलआयसीची इक्विटी गुंतवणूक 59 हजार कोटी

एलआयसीची इक्विटी गुंतवणूक 59 हजार कोटी 

वृत्तसंस्था/ मुंबई

जीवन विमा कंपनी (एलआयसी) ने 2018 या आर्थिक वर्षात रुपये 58,881.7 कोटींची इक्विटी गुंतवणूक केली आहे. आत्तापर्यंत केलेल्या गुंतवणुकीमुळे एकूण गुंतवणुकीची रक्कम 4.6 लाख कोटींपर्यंत पोहोचली असून त्यात 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2017-18 च्या वार्षिक अहवालानुसार देशातील सर्वात मोठय़ा जीवन विमा कंपनीने 3.9 लाख कोटींची गुंतवणूक केली होती.

विशेषतः एलआयसी दरवर्षी 50 हजार ते 55 हजार कोटी पर्यंतची गुंतवणूक करत असते. आर्थिक वर्षाच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट कंपनीने पूर्ण केले असून ही गुंतवणूक थेट विमाधारकांच्या खात्यातून केली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. विमा कंपनी विमाधारकांना विम्याच्या मुदतीनंतर काही विशिष्ट स्वरुपात परफेड देत असून दावा निकाली काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करते.

2018 च्या आर्थिक वर्षात गुंतवणूकीच्या व्यतिरिक्त प्राधान्याने महसुलात 547 कोटी रुपये भरण्यात आले आहेत. ज्यावेळी विमा कंपनीने आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडाच्या वर्गवारीत 248 कोटी गुंतविले तेव्हा 17 च्या आर्थिक वर्षातील गुंतवणूक रु. 1710.3 कोटींवरून कमी झाली. तथापि या गुंतवणुकीमुळे सरकारी सुरक्षेला मोठा हातभार लाभला आहे. सरकारी सुरक्षेच्या गुंतवणुकीत 16.2 कोटींची गुंतवणूक केल्यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2.2 लाख कोटींची वाढ झाली आहे.

जीवन विमा कंपनी ही विमा पॉलिसीमधील दीर्घकाळाचा स्पर्धक असून एकूण गुंतवणुकीच्या 75 टक्के सरकारी सुरक्षेमध्ये गुंतवणूक करते. एलआयसीने 2019 च्या आर्थिक वर्षासाठी 43 हजार कोटींच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठरविले असून पुढील आर्थिक वर्षासाठी 25 दशलक्ष पॉलिसी विकण्याची योजना आखली आहे.