|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » उद्योग » टीसीएस 8 लाख कोटींची दुसरी भारतीय कंपनी

टीसीएस 8 लाख कोटींची दुसरी भारतीय कंपनी 

रिलायन्सपेक्षा 15 हजार कोटीने पुढे

वृत्तसंस्था/ मुंबई

आयटी क्षेत्रात कार्यरत असणारी टाटा कंन्सलटींग सर्व्हिसेस (टीसीएस) आठ लाख कोटी किमत असणारी भारतातील दुसरी कंपनी ठरली आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी 2 टक्क्यांच्या तेजीसह वाढत जावून 2 हजार 94 रुपय किमती पर्यत खरेदी झाले आहेत. यामुळे कंपनीचे बाजारी मुल्ये वाढल्याची नोंद करण्यात आली.

प्रथमच कंपनीचे बाजारी मुल्ये 8.02 लाख कोटी पर्यत पोहोचले आहे. या अगोदर 23 ऑगस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने हा उच्चाक गाठला होता. रिलायन्स इंडस्ट्रीजचा मार्केट कॅप 7.87 लाख कोटी रुपयापर्यत पोहोचला होता. यात टीसीएसच्या 15 हजार कोटीने रिलायन्स पाठीमागे होती.

टीसीएस चे मार्केट कॅपीटल प्रथम 25 मे रोजी 7 लाख कोटी पर्यत गेला होता. तर बाजार बंद झाल्यानंतर 6.87 लाख कोटी रुपये राहिले होते. तर 20 दिवसाच्या कालावाधीनंतर 15 जून ला कंपनी पुन्हा 7 लाख कोटीचा टप्पा पार केला होता.

बाजारातील

टॉपच्या पाच पंपन्या

कंपनी          मार्केट कॅप

टीसीएस….. 8.02

रिलायन्स…. 7.87

एचडीएफसी बँक 5.63

आयटीसी…. 3.77

हिंदुस्थान युनि.    3.56