|Monday, April 22, 2019
You are here: Home » उद्योग » टाटा मोटर्सकडून चार कार लाँच होणार

टाटा मोटर्सकडून चार कार लाँच होणार 

नवी दिल्ली

 टाटा मोटर्स येत्या काळात आपली नवीन उत्पादने बाजारात सादर करणार आहे. त्यासाठी कंपनी योजना तयार करत आहे. यात विविध गाडय़ाचे यात सादरीकरण करण्यात येणार आहे. टाटाकडून टिआगो जेटीपी कार ऑटो एक्सपो 2018 मध्ये कार सादर करण्यात आल्या हेत्या. या मॉडेलची निर्मीती जेयम ऑटो आणि टाटा मोटर्स यांनी एकत्रितपणे केली आहे. या कारचे लाँचिग करण्यात आल्यानंतर भारतात जादा विक्री होणारी कार असणार आहे. या कारची किंमत 6 लाख रुपयां पर्यत ठेवली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

या कारमध्ये नवीन उपकरणासह अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. बोनटवर एअर एनटेक, रिडीझायन बंपर आणि कारमध्ये समान पातळीवर 1.2 लीटरचे टब्रोचार्ज 3 सिंलडर असणारे पेट्रोल इंजीन असे नवीन फिचर्स असणारी कार ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ऑक्टोबर शेवटी कारचे लाँचिग करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. 

Related posts: