|Monday, November 19, 2018
You are here: Home » उद्योग » भारतीय एअरलाईन्स इंडस्ट्रीजला 1.9 अब्ज डॉलर्सचा तोटा

भारतीय एअरलाईन्स इंडस्ट्रीजला 1.9 अब्ज डॉलर्सचा तोटा 

चालू वर्षातील आकडेवारी प्रसिद्ध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चालू आर्थिक वर्षात भारतीय एअरलाईन्सला एकुण 1.9 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा तोटा झाला आहे.(13 हजार 557 कोटी रुपये) एवियशन कंन्सलटींग फर्म (सीएपीए) इंडिया यांच्या अहवालानूसार माहिती देण्यात आली आहे. वाढत्या  तेलाच्या किंमती आणि भारतीय रुपायात होत असणारी घसरण एअरलाईन्स इंडस्ट्रीजला तोटा होण्यास जबाबदार असल्याची नोंदही करण्यात आली आहे.

भारत हा जगाताला दुसऱया क्रमाकांचा सर्वात वेगाने एअरलाईन्स उद्योगात प्रगती करणारा देश आहे. विमानाच्या 90 टक्के आसन बुकिंग केली असली तरी एअरलाईन्स कंपन्याना नफा कमवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर भारत हा स्वस्त डोमेस्टीक एअरलाईन्स मधिल एक बाजारात आहे. यात अडीच तासाच्या प्रवासाच्या तिकीटासाठी 3 हजार 500 रुपये आकारले जातात.

भारत सरकार एअर इंडिया विलिनीकरण करण्याच्या विचारात आहे परंतु त्यांना तसे खरेदी करणारे कोण भेटले नाही.जूनमध्ये सरकारकडून 76 टक्के स्टेक बोली लाववण्यात आली होती. तरीही कोणीच खरेदी करणारी पार्टी मिळाली नाही. जेट एअरवेज (इंडिया) लिमीटेड या कंपनीचा वाटचाल तोटय़ातच आहे.  एप्रिल-जून तिमाहीत 1 हजार 323 कोटी रुपयांचा तोटा झाल्याची नोंद केली आहे. तर इंडिगो या सर्वात मोठय़ा विमान कंपनीला तीन वर्षात एका तिमाहीत सर्वात कमी फायदा झाला आहे.

सीएपीए यांच्या अहवालानूसार तोटय़ाची भरपाई करण्यासाठी तिकीटाचे दर वाढवण्यात आले नाहीत. तरी इंडिगो इअरलाईन्स सोडून बाकी विमान कंपन्याच्या बॅलेन्सशीट डासळय़ाचे चित्र आहे.

Related posts: