|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रामायण-महाभारत हे अद्वितीय गंथ

रामायण-महाभारत हे अद्वितीय गंथ 

प्रा. अनंत मनोहर यांचे प्रतिपादन : अनुवादित ग्रंथांचे अनावरण

प्रतिनिधी/ बेळगाव

रामायण-महाभारत हे भारतीय संस्कृतीचे यथार्थ दर्शन घडविणारे अद्वितीय ग्रंथ असून साऱया विश्वात त्याला तोड नाही. रामायणात राम हा मर्यादा पुरुषोत्तम नीतीचे पालन करणारा आहे तर महाभारत हे परिस्थितीप्रमाणे नीती, अनीती, सत्य, असत्याची फिरवाफिरव करणारे नीतीमत्तेला सोडून वागणारे मानवजातीला साजेसे आहे. त्यामुळे यांचे महत्त्व खूप मोठे आहे, असे विचार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत अनंत मनोहर यांनी व्यक्त केले.

लोकमान्य ग्रंथालय अनगोळ रोड येथे बुक लव्हर्स क्लबतर्फे आयोजित महाभारताच्या अनुवादित इंग्रजी पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. महाभारत हे सर्व समावेशक आहे. त्यातील धर्मराजासह सर्व व्यक्ती टीकेस पात्र अशाच होत्या. दुसऱया भागातील युधिष्ठिर विशेष वाटला, असे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रास्ताविक करताना क्लबचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी, भांडारकर संशोधन संस्थेच्या संशोधनाच्या आधारे काही समजुतींवर प्रकाशझोत टाकला आहे. मूळ महाभारताचे 8800 श्लोक आहेत. पुढे अनेक हस्तलिखितांच्या आधारे ते 24 हजार व पुढे 95 हजारपर्यंत वाढविले गेले. आदी आजवर ज्ञात नसलेल्या अनेक बाबींचा उहापोह केला.

अशोक याळगी यांनी सूत्रसंचालन तर किशोर काकडे यांनी आभार प्रदर्शन केले.