|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ज्ञान प्रबोधन मंदिरात दहीहंडी साजरी

ज्ञान प्रबोधन मंदिरात दहीहंडी साजरी 

प्रतिनिधी/ बेळगाव

ज्ञान प्रबोधन मंदिर आयसीएसई शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने दहीहंडीचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. प्राथमिक विभागातील इयत्ता पहिली व दुसरी मुलींच्या गटामध्ये आर्या ठाकुर व मुलांच्या गटामध्ये मोहम्मद पटवेगार यांनी दहीहंडी फोडली. इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी मुलींच्या गटामध्ये विद्या लमाणी व मुलांच्या गटामध्ये प्रथम रायकर यांनी दहीहंडी फोडली.

यावेळी प्राचार्या मंजिरी रानडे व प्रशासकीय अधिकारी डॉ. गोविंद वेलिंग यांनी श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक अविनाश व शिक्षक शिवप्रसाद यांनी परिश्रम घेतले.

Related posts: