|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » संचयनी चौकातील रस्त्याचे काम गतीमान

संचयनी चौकातील रस्त्याचे काम गतीमान 

बेळगाव/ प्रतिनिधी

राष्ट्रपतींच्या दौऱयामुळे शहरातील रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. संचयनी चौक परिसरातील रस्ता प्रत्येक पावसाळय़ात खराब होत असल्याने या रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संपूर्ण रस्ताच खोदण्यात आला आहे. हे काम गतीमान झाले आहे.

शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व  सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश बेळगाव दौऱयावर येणार आहे. या पार्श्वभुमिवर शहरातील रस्त्यांचे दुरूस्तीचे काम विविध खात्याने सुरू केले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने संचयनी चौकातील रस्त्यासह विविध रस्त्यांच्या डागडुजीस प्रारंभ केला आहे. यामुळे राष्ट्रपतींच्या दौऱयाच्या निमित्ताने रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. संचयनी चौक येथील रस्त्यावरील पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. मोठय़ा पावसात पाणी साचून राहते. यामुळे येथील रस्ता दरवषी खराब होतो. यंदा तर या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या परिसरातून वाहनधारकांना ये-जा करणे मुश्किल बनले आहे. या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र पुन्हा हा रस्ता खराब होण्याची शक्मयता आहे. यामुळे या रस्त्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. याकरिता संचयनी चौक दरम्यानचा रस्ता पूर्णत: खोदून नव्याने करण्यात येणार आहे. हे काम गतीमान झाले असून, मंगळवारी हा रस्ता खोदण्यात आला. लवकरच हा रस्ता नवीन करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

Related posts: