|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा

ईस्कॉनतर्फे श्रील प्रभूपाद यांचा जन्म दिन साजरा 

जन्म दिनानिमित्त विविध कार्यक्रम, असंख्य कृष्ण भक्तांची उपस्थिती

बेळगाव / प्रतिनिधी

येथील इस्कॉन वतीने मंगळवारी इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभूपाद यांचा जन्मदिन सोहळा साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भक्तगण बहुसंख्येने सहभागी झाले होते. पूजन, भजन आणि प्रवचनात सहभागी होऊन भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. यानिमित्त मंदिराला करण्यात आलेली आरास लक्षवेधी ठरली होती.

संपूर्ण जगाला कृष्णभक्तीचे महत्व पटवून सांगण्याकरिता  श्रील प्रभूपाद स्वामीजींचे योगदान खूपच मोठे आहे. त्यांनी यासाठी  108 मंदिरांचे निर्माण केले आहे. असे यावेळी सांगण्यात आले. भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. याचा लाभ बहुसंख्य भाविकांनी घेतला. इस्कॉनचे संस्थापक श्रील प्रभुपाद यांचा जन्मदिन अविर्भाव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून मंगळवारी सकाळी टिळकवाडी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुष्पांजली, आरती करण्यात आली. याप्रसंगी भक्तांनी मंदिरात गर्दी केली होती.

इस्कॉनचे ज्ये÷ संन्यासी भगवान प्रभू यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम झाला. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त इस्कॉनच्यावतीने सोमवारपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिर परिसरात गो सेवा आणि भगवान श्रीकृष्णावर आधारित स्लाईड शोद्वारे माहितीपट दाखविण्यात आले. तसेच इस्कॉन आणि श्रीकृष्ण यांच्यावर आधारीत विविध पुस्तकांची विक्रीही सुरू होती. बेळगाव शहरासह तालुक्मयातील असंख्य श्रीकृष्ण भक्तांनी उपस्थित राहून जन्माष्टमी महोत्सवाचा सोहळा उत्साहात साजरा केला.