|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » Top News » सावत्र आईनेच रचला 9वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट

सावत्र आईनेच रचला 9वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. सावत्र आईनेच 9 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार घडवून आणण्याचा व नंतर तिची निर्घृण हत्या करण्याचा कट रचल्याची हादरवणारी आणि तितकीच चीड आणणारी घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यामध्ये उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात नऊ वर्षांच्या मुलीचा सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. मुलीच्या सावत्र भावासह तीन जणांचा या गुन्हय़ामध्ये समावेश होता. मुलीची हत्या केल्यानंतर चाकूने तिचे डोळे बाहेर काढण्यात आले आणि ओळख पटू नये म्हणून तिच्या शरीरावर ऍसिड ओतून मृतदेह जंगलामध्ये फेकण्यात आला. पोलीस अधीक्षक इम्तयाज हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाली होती आणि 2 सप्टेंबरला तिचा मृतदेह छिन्हविछिन्ह अवस्थेत जंगलात आढळून आला होता. याप्रकरणी सावत्र आईसहीत तिचा मुलगा आणि त्यांच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांच्या दोन पत्नी होत्या. यातील एक जण मूळची झारखंडची आहे तर दुसरी काश्मीरमधीलच आहे. ज्या मुलीची हत्या करण्यात आली, ती झारखंडमधील पत्नीची मुलगी होती. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी महिलेने सांगितले की, पती दुसऱया पत्नीसोबत अधिक वेळ घालवायचा आणि आपल्या सर्व मुलांमध्ये याच मुलीचे सर्वात जास्त लाड व्हायचे. यामुळे कौटुंबिक तणाव वाढत होता. पतीच्या दुसऱया पत्नीबाबत असलेल्या द्वेष भावनेतून आरोपी महिला सावत्र मुलीला जंगलात घेऊन गेली. यावेळेस तिने स्वतःसोबत चाकूही घेतला होता. याच चाकूच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, घटनास्थळाहून चाकू आणि कुऱहाड ताब्यात घेण्यात आली आहे.